सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर रविवारी (ता. २९) पहाटे मुंबई येथून शिर्डी कडे जाणाऱ्या साई भक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घोरवडघाटनजीक घडलेल्या या घटनेत गाडी संपूर्ण जळून खाक झाली.
गाडीमधील सर्व 18 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मुंबई येथून शिर्डीच्या दिशेला अठरा प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी टेम्पो ट्रॅव्हल गाडी (MH04 GP0484) ही गाडी घोरवड घाटातून पहाटे साडेपाच वाजेच्या जात असताना गीताई पेट्रोल पंपा समोर गाडीमधून अचानक धूर निघू लागला.
चालकाने प्रसंगा वधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. गाडीतील सर्व अठरा प्रवाशांना सुरक्षित खाली उतरून दिले. त्यानंतर गाडीने क्षणार्धात पेट घेतला.
घटनेत गाडी संपूर्ण जळून खाक झाली. प्रवाशांचे सामान सुद्धा जळून गेले. घटनेची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिकेची अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला.
सिन्नर पोलिसांचे मदत पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निवृत्ती गीते, गौरव सानप हे पुढील तपास करीत आहे.




0 Comments