जळगाव : तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बापाने विनयभंग केला.
त्यावेळी अल्पवयीन मुलगी घरात अभ्यास करीत होती. तिच्या वडीलांनी तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. घराबाहेर काम करत असलेली आईने घरात धाव घेऊन मुलीला सोडविले.
त्यानंतर पीडितेसह तिच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात नराधम बापाविरोधात तक्रार दिली. त्यावरून रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.
0 Comments