दुदैवी! बार्शीत व्यावसायिक तरूणाने संपवलं जीवन...

 

सोलापुरच्या बार्शीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणाने रुग्ण नसलेल्या रूममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमनाथ पिसाळ अस यां आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.


घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ पिसाळ हा गावातच फॅब्रिकेशनचा व्यवसाय करीत होता. त्याला सतत पित्ताशयाचा, मणक्याचा त्रास, पचनाचा त्रास आणि पोटात दुखण्याचा त्रास होत होता.


 त्यामुळे त्यास सतत मानसिक त्रास होत होता. त्यामुळे नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात  त्याला उपचारासाठी दाखल केले होते.

सोमनाथवर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मेडिसिनच्या जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होता. तो बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने रुग्ण नसलेल्या आणि बांधकाम चालू असलेल्या वरच्या मजल्यावर गेला आणि स्लॅबच्या एका हूकला नॉयलानची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.


बार्शी  शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments