सावकाराच्या जाचामुळे दोघा सख्ख्या भावांनी पिले विष , एकाचा मृत्यू

 

नाशिक: नाशिकरोड येथे राहणारे जगन्नाथ लक्ष्मण कांबळे व रवींद्रनाथ लक्ष्मण कांबळे हे दोघे सख्खे भाऊ, नाशिकरोड येथील एका राजकीय पक्षाशी संबंधित नेत्याच्या भावाकडे कामाला होते. दोघे भाऊ या संशयित सावकाराकडे कर्जदारांकडून वसुलीचे काम करत होते. या दोघांकडून कर्ज वसूल होत नसल्याने सावकाराने दोघांना कर्जाची रक्कम फेडण्यासाठी तगादा लावला होता. या जाचाला कंटाळून दोघांनी विष घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. यात रवींद्रनाथ याचा मृत्यू झाला आहे. जगन्नाथची प्रकृती चिंताजनक आहे. या विरोधात मृताच्या नातेवाईकांनी संशयित सावकारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करता भेट चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ झाली. पोलीस प्रशासनाने नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तणाव निर्माण झाला होता.


नातेवाईकांचा आरोप: रघुनाथ कांबळे यांनी सांगितले की, खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळले होते. तर भीतीपोटी कांबळे बंधूंपैकी एक भाऊ काही दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला होता. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी मिसिंगची तक्रारही दाखल केली होती. यानंतरही वसुलीसाठी तगादा सुरूच असल्याने दोघा भावांनी आत्महत्याचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. राजकीय पक्षाच्या नावाने धमकी देणे, कुटुंबियांना शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे हे प्रकार सुरूच होते असे नातेवाईकांनी म्हटले आहे. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून दांपत्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली होती. त्यानंतर सातपूर येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकाराने शहरात सावकारी पाश घट्ट होत चालल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येत आहे.


सावकारांचा जाच घटना: एका घटनेत पंचवटी परिसरातील एका कर्जदाराने खासगी सावकाराकडून साडेचार लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यावरील दहा टक्के दराने व्याजाचे असे 26 लाख 98 हजार रुपये परत घेण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला इनोव्हा कारमध्ये बळजबरीने बसवून घेतले होते. त्याला जीवे मारण्याची धमकी देत पिडीतेच्या पतीकडून 50 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून घेतले होते. त्यानंतर थेट घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात खासगी सावकार चेतन प्रकाश बोरकर 32 राहणार तांबोळी नगर हिरावाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


जिवे मारण्याच्या धमक्या: तिसऱ्या घटनेत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पीडित सुरेश पोराला पुजारी यांनी संशयित खासगी सावकार विजय शंकरराव देशमुख याच्याकडून जानेवारी 2007 मध्ये पाच टक्के व्याजाने नऊ लाख रुपये घेतले होते. या नऊ लाखांच्या मोबदल्यात 2007 ते 2022 पर्यंत वेळोवेळी व्याजापोटी 44 लाख नव्वद हजार रुपये रोख आणि सहा लाख रुपये बँकेतून ट्रान्सफर करून असे 50 लाख 90 हजार रुपये दिले होते. तरी देखील सावकाराने 20 लाख रुपये बाकी असल्याचे सांगत पुजारी यांना आणि त्यांच्या मुलीला वारंवार फोन करून शिवीगाळ करीत जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

0 Comments