भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्यांचा अंत

 

हैदराबाद : भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हैदराबाद शहरात ही घटना घडली असून प्रदीप असं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे.


१९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


अधिक माहितीनुसार, गंगाधर हे मृत प्रदिपच्या वडिलांचं नाव असून ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. 

ते आपल्या मुलाला कामाच्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्यावेळी तो एकटाच फिरत असताना तेथील भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये तो जबर जखमी झाला. 


त्यानंतर प्रदिपला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.


Post a Comment

0 Comments