भरदिवसा महिलेची निर्घृण हत्या....

 

नागपुर: बांधण्यास काढल्याने बाजुला असलेल्या जागेत राहू देण्याच्या मागणीतून झालेल्या वादात गुन्हेगाराने चाकूने वार करीत महिलेची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास इमामवाडा पोलिस ठाणे हद्दीतील रामबाग येथील झेंडा चौकात घडली.


पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली आहे.

आरती निकोलस (वय३५) असे मृताचे तर बादल राजू कुमरे (वय २५)असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी आरती यांचे पती व दोन मुले अन्यत्र राहायला गेले. आरती या आई सुमन यांच्यासोबत राहायच्या. त्यांच्या शेजारी कुमरे कुटुंबीयांचे राहतात. कुमरे कुटुंबाने घराचे बांधकाम सुरू केले. त्यांना आरती यांची राहण्यासाठी हवी जागा हवी होती.


आरती यांनी नकार दिला होता. त्यामुळे कुमरे कुटुंबियांनी समोरच्या जागेवर अतिक्रमण करीत वास्तव्य सुरू केले. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावरही ते अतिक्रमण केलेल्या जागेवरून जात नसल्याने आरतीने त्यांना हटकले. त्यामुळे शनिवारी दुपारी त्यांच्यात वाद झाला. वादानंतर बादल हा तिथून निघून गेला.

काहीच वेळात तो परतला, त्याने आरतीच्या घरात शिरला, त्याचा हातात चाकू असल्याचे बघून सुमनबाई या आरती यांच्या बचावासाठी धावल्या असता बादलने त्यांना ठार मारण्याची धमकी देत तेथेच उभे राहण्यास सांगितले. सुमनबाई घाबरल्या व त्याने आरती यांच्या पोटावर, मानेवर सपासप वार केले. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व बादल पसार झाला.

भरदुपारी घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकमल वाघमारे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जखमी आरती यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून बादलचा शोध घेत त्याला अटक केली.


शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक गुन्हेगारांना स्थानबद्ध केल्यावरही गुन्हेगारीचा आलेख कमी झालेला नाही. पोलिस यंत्रणा सजग असतानाही अशा घटना घडणे सुजाण नागरिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. शहरातील अवैध दारू विक्रीसह मादक पदार्थांच्या व्यापारावर आळा घालणे आवश्‍यक असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments