मुंबई : असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून तुम्ही हसू आवरणार नाही. येथील काही व्हिडीओ खरे असतात. तर काही व्हिडीओ हे बनवले जातात.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुण मंडळी आता कन्टेन्ट तयार करण्याच्या मागे लागले आहेत, तर काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. असंच काहीसं एका तरुणीने करण्याचा प्रयत्न केले तेव्हा तिला तिच्या आईने धू-धू धूतलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी तिचा फोन घेते आणि तो जवळील कारंज्यांमध्ये बुडवते.
तेव्हा या तरुणीची आई तिथेच उभी असते, पण आधी तिचं लक्ष नसतं, पण जेव्हा तिला हे लक्षात येतं, तेव्हा ती तरुणीला तिच्या मुर्खपणासाठी एका मागून एक कानशिलात मारते. आई मारत असताना ही तरुणी तिला सांगण्याचा प्रयत्न करते की व्हिडीओ सुरु आहे आणि ती व्हिडीओसाठी सगळं करत आहे, पण तिची आई काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते, ती तरुणीला कानशिलात मारु लागते.
हा व्हिडीओ vishakha_chaudhary_ नावाच्या अकाउंटवरुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. पण व्हिडीओमधील कन्टेन्ट मनोरंजनासाठी बनवला गेला असावा असं सांगितलं जात आहे.
0 Comments