छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जन्मोत्सव सोहळया निमित्त पंढरपूर येथील कर्नल भोसले चौक येथे शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस आमदार समाधानदादा आवताडे व डीवायएसपी विक्रम कदम यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
व रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन तथा मि. नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांचेसह राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले, किरण आप्पा भोसले, मुन्ना भोसले, पृथ्वीराज भोसले, युवराज भोसले,
शैलेश भोसले, नितीन गांधी, बादलसिंह ठाकुर, विनोद राज लटके, प्रसाद भैया कळसे, दत्ता काळे महाराज, प्रा.शरद चव्हाण सर, नितीन करंडे, भास्कर तात्या जगताप, लखनराज थिटे, पांडूरंग वाडेकर,
राहुल गावडे, प्रसाद सातपुते, समाधान घायाळ, लक्ष्मण जाधव, भास्कर घायाळ, उमेश वाघमारे, आकाश आटकळे, अमीन भाई शेख, अतिक मुलाणी, अविनाश मोरे सर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments