अभिनय क्षेत्रातून एक वाईट बातमी समोर येत आहे. हॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. ज्यामुळे कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे. ‘डेज ऑफ ऑवर लाइव्स' आणि 'हॉलीवुड हाइट्स' यांसारख्या नाटकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेता कोडी लोंगो याचं निधन झालं आहे.
अभिनेता कोडी लोंगो याने वयाच्या ३४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सध्या सर्वत्र कोडी लोंगो याच्या नावाची चर्चा आहे. कोडी लोंगो याच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे.
कोडी लोंगो याच्या निधनाची माहिती अभिनेत्याचा मॅनेजर एलेक्स गिटलसन याने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. एलेक्स गिटलसन ट्विट करत म्हणाला, ‘माझ्या मित्राने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनानंतर प्रत्येकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंब देखील कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तुझी प्रचंड आठवण येईल…’ असं म्हणत मॅनेजरने दुःख व्यक्त केलं आहे.
राहत्या घरी आठळला अभिनेत्याचा मृतदेह
कोडी लोंगो अमेरिका येथे टेक्सास याठिकाणी असलेल्या त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला. जेव्हा अभिनेत्याची पत्नी स्टेफनी लोंगो हिला पतीच्या निधनाची माहिती मिळाली, तेव्हा ती डान्स स्टुडिओमध्ये काम करत होती. त्यानंतर स्टेफनी लोंगो हिने पोलिसांनी तपासासाठी बोलावलं. तेव्हा कोडी लोंगो घरात बेडवर मृत अवस्थेत आढळला.
पतीच्या निधनानंतर स्टेफनी लोंगो हिच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. स्टेफनी लोंगो म्हणाली, ‘कोडी लोंगो प्रचंड चांगला व्यक्ती होता. तो फक्त माझा पती आणि मुलांचा वडील नव्हता, तर तो आमचं जग होता. तो एक उत्तम पिता होता… आम्ही तुला कधीही विसरू शकत नाही….’ अशी भावना कोडी लोंगोच्या पत्नीने व्यक्त केली आहे.
अभिनेता कोडी लोंगो याचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झालं, यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोडी लोंगो याचा मॅनेजर म्हणाला, ‘आम्ही एकत्र काम करत होतो. पण त्यापलीकडे कोडी लोंगो माझा जवळचा मित्र होता. कोडी लोंगो याने म्यूझिकमध्ये करिअर करण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी अभिनयापासून ब्रेक घेतला होता. शिवाय कोडी लोंगो याच वर्षी अभिनय क्षेत्रात देखील पदार्पण करणार होता. त्यासाठी कोडी लोंगो उत्साही देखील होता. पण नियतीला काही वेगळचं मान्य होतं.’ असं म्हणत कोडी लोंगो याच्या मॅनेजरने भावना व्यक्त केल्या आहेत.
0 Comments