पुणे जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बारामती-इंदापूर रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला
अनिता शिवाजी शिंदे आणि अर्चना श्रीशैल्य सनमत, अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
याप्रकरणी अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकाच वेळी दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्देवी घटना बारामती इंदापूर रस्त्यावर जंक्शन येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनिता आणि अर्चना या दोन्ही महिला दररोज सकाळी मॉर्निग वॉकला जात असत. नेहमीप्रमाणे त्या आज (बुधवार) सकाळच्या सुमारास मॉर्निग वॉकला गेल्या होत्या यावेळी बारामती-इंदापूर रस्त्यावर त्या जात असताना, भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही महिला रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या.
अपघातात दोन्ही महिलांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळाली. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
0 Comments