आई दवाखान्यात अॅडमिट असल्याने शेजारी राहणाऱ्या वहिनीकडे पैसे मागितल्याने चिडून आम्हाला का पैसे मागतो म्हणून पुतण्या आणि वहिनीने सुताच्या कासऱ्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
माचणूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी जखमी लक्ष्मण श्रीमंत सरवळे (वय ४५, रा. माचणूर) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी लक्ष्मण सरवळे हे माचणूर येथे त्याच्या तीन मुली श्रावणी, समृद्धी आणि कृष्णा एकत्र वास्तव्यास आहेत.
मोलमजुरी करून ते गुजराण गुरुवारी मजुरीहून आल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या वहिनी लता यांच्याकडे आई दवाखान्यात अॅडमिट असल्याने उपचारासाठी पैसें मागितले.
एवढ्यात पुतण्या ओंकार आला आणि त्याने आम्हाला कशाला पैसे मागतो म्हणून सुताच्या कासऱ्याने लक्ष्मणला मारहाण सुरू केली. त्यावेळी वहिनी लता यांनीही शिवीगाळ करून मारहाण केली.
आरडाओरडा ऐकून शेजारी रमेश बजरंग बराटे आणि सचिन श्रीकांत यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे




0 Comments