बोगस कर्जाच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून बाभुळसर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

 

मांडवगण फराटा : पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन अधिकारी, बाभूळसर बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे तत्कालीन सचिव व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज दाखवुन फसवणूक केली व या बोगस कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिल्याने या जाचाला कंटाळून शहाजी ज्ञानदेव मचाले (वय-६५) (रा.


बाभूळसर बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे ) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि. २० ) रोजी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची फिर्याद मृत शेतकऱ्याचे पुतणे गणेश तान्हाजी मचाले (वय-४४) यांनी दाखल केली आहे.


मांडवगण फराटा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजी ज्ञानदेव मचाले यांनी सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घरासमोरील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी १) नवनाथ चंद्रकांत फराटे २) बाळासो बबन फराटे दोघेही रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे तसेच ३) मच्छिंद्र सुखदेव संकपाळ रा. आंबळे ता. शिरुर जि. पुणे ४) अनिल सुभाष लोहार रा. न्हावरा ता.

शिरुर जि.पुणे ५) अर्जुन प्रल्हाद जगताप रा. तांदळी ता. शिरुर जि. पुणे ६) विजय सोपान नागवडे रा.बाभूळसर ता. शिरुर जि. पुणे ७) विजय चव्हाण रा. पारगाव ता. दौंड जि. पुणे व बाभूळसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे तत्कालीन संचालक मंडळ यांच्यावर सदर शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे, प्रल्हाद जगताप, पोलीस नाईक संपत खबाले, पोलिस नाईक अमोल गवळी, ठाणे अंमलदार योगेश गुंड, कॉन्स्टेबल राजाराम गायकवाड, उमेश जायपत्रे,भाऊसाहेब टेंगले हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments