भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

 

भडगाव (जि. जळगाव) : शहरातील एका व्यक्तीस भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली.


यात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. वाहनचालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.


भडगाव शहरातील गंजीवाडा भागातील मशिदीजवळ शफियोद्दिन कमरोद्दिन शेख (वय ५०, रा. गंजीवाडा, भडगाव) यांना भरधाव ट्रॅक्ट्ररने (एपी २५, एआर ४७०४) पुढील उजव्या चाकाने समोरून जोरात धडक मारली.


अपघातात शफियोद्दिन कमरोद्दिन शेख यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चालक घटनास्थळावरून पसार झाला. मृताचा भाऊ शेख बशीर शेख कमरोद्दीन, (रा. गंजी मोहल्ला, भडगाव) यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments