सोलापूर: पतीच्या मृत्यूनंतर मुलाला मोठ्या कष्टाने शिकवून इंजिनिअर बनवल्यानंतर मुलाचा अपघाती मृत्यू , महिलेचा आक्रोश

 

सोलापूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीची धडक होऊन मोठा भीषण अपघात झाला.


अपघातात दुचाकीवरील विनीत श्रीनिवास पोरंडला (वय 26 वर्ष, रा. भवानी पेठ, सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला. तसंच पवन मधुकर नामपल्ली (वय 25 वर्ष, रा. भवानी पेठ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र विनीतचा अगोदरच मृत्यू झाला तर पवन हा तरुण गंभीर जखमी असून त्याला अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.


विनीत हा नुकताच सोलापुरातील एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशनमध्ये अंतिम वर्षाची परीक्षा पास झाला होता. तर जखमी पवन नामपल्ली हा औषध कंपनीत मेडिकल रिप्रेजेंटिव्ह म्हणून कार्यरत होता. या अपघाताची माहिती मिळताच मृत विनीतची आई कलावती पोरंडला यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलाचा मृतदेह पाहून या माउलीने हंबरडा फोडला. हे पाहून शासकीय रुग्णालयातील इतर नागरिकांनाही अश्रू अनावर झाले.

कसा घडला अपघात?
विनीत पोरंडला व पवन नामपल्ली हे दोघे सोलापूरकडून अक्कलकोटकडे दुचाकी (एमएच13-ईबी-0268)वरून गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जात होते.यादरम्यान अक्कलकोट रोडवरील टाटा शोरूमजवळ कंटेनर (एम एच 45 ए एफ 6191) हा त्यांच्या दुचाकीला आडवा आला. वेग जास्त असल्याने दुचाकी नियंत्रणात आली नाही आणि दोन्ही तरुण कंटेनरखाली घसरत गेले. अपघात इतका भीषण होता की, विनीत पोरंडला याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मेंदू रस्त्यावर पडला होता. 


मुलाचा मृतदेह पाहून माऊलीचा हृद्य पिळवटून टाकणारा आक्रोश
कलावती पोरंडला या एकल महिला आहेत. कलावती यांना दोन मुलं होती.
पतीच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी कलावती यांच्यावर आली होती.
कलावती या सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत आहेत.
त्यांचा मोठा मुलगा दिव्यांग आहे, तर लहान मुलगा विनीत पोरंडला हा अभ्यासात हुशार असल्याने कलावती
यांनी खूप मेहनतीने विनीतला इंजिनिअर बनवले होते.
मात्र त्याचा असा दुर्दैवी अपघात झाल्याने माऊलीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Post a Comment

0 Comments