गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन


 पंढरपूर दि. 22 :- गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.डॉ.प्रमोद सावंत यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. 


यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, सदस्या शकुंतला नडगिरे


 यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.


यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मंदीर समितीचे व्यवस्थापक


 बालाजी पुदलवाड यांच्यासह मान्यवर पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments