पोलिस होण्याचं स्वप्न अर्धवट राहीलं, सराव करताना युवकाचा मृत्यू

 

अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादीजन येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


अनंत लाखे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अनंत हा सराव करीत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्याची प्रकृती बिघडल्याचे समजताच गावातील नागरिक त्याला रुग्णालयात  नेत असताना वाटेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरगाव सादीजन या गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादीजन येथील अनंता हा युवक सकाळी सहा वाजेचा सुमारास मोरगाव सादीजन ते निमकर्दा रोडवर पोलीस  भरतीचा सराव करीत होता. यावेळी सरावासाठी धावत असतांना अनंताचा अचानक श्वास दाटून आला.


त्याची प्रकृती बिघडल्याची वार्ता गावात वारासारखी पसरली यानंतर लगेच घटनास्थळी धाव घेत गावातील नागरीकांनी त्याला उपचारार्थ अकोला येथील सर्वापचार रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, रस्ताने जात असता त्याचा मृत्यू झाला. अनंतच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments