पंढरपूर : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय मुंबई तर्फे देण्यात येणारा मराठी भाषेसाठी केलेल्या कार्याबद्दल दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये दोन लाख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
प्रा.डॉ.द.ता.भोसले यांनी आतापर्यंत मराठी भाषेसाठी ग्रामीण बोलीचा संग्रह (दोन), दुर्मिळ म्हणींचा संग्रह (तीन) या विशेष योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रा.डॉ.द.ता.भोसले यांनी आतापर्यंत मराठी भाषेत चार कादंबऱ्या, बारा कथासंग्रह, आठ ललित ग्रंथ, दहा लोकसाहित्य, लोकसंस्कृतीवरील
ग्रंथ, आठ समीक्षा ग्रंथ, दोन चरित्र ग्रंथ, लेखकांच्या पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावनेची तीन पुस्तके व चौदा संपादने इत्यादी पुस्तके प्रकाशित केली आहेत.
डॉ द.ता.भोसले यांना सोळा जीवन गौरव पुरस्काराने आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे चार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,भारती विद्यापीठ पुणे, बाळासाहेब विखे प्रतिष्ठान, आचार्य अत्रे प्रतिष्ठान, दमाणी साहित्य पुरस्कार इत्यादी मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
एकूण आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी मराठी भाषा अभ्यासक्रम मंडळ, शिवाजी विद्यापीठ पुणे, बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ पुणे या संस्थावर काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित व्याख्यान मालेत व्याख्याने दिली आहेत. तसेच त्यांची सोलापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, रामानंदतिर्थ विद्यापीठ अमरावती, मराठवाडा विद्यापीठ येथे पुस्तके सभ्यासक्रमासाठी लागली आहेत.
त्यांनी साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, लोकसाहित्य लोकसंस्कृती मंडळ या मान्यवर संस्थांवर काम केले आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेक निकटवर्तीय तसेच मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




0 Comments