डोळ्यात मिरचीपूड टाकून व्यापाऱ्याचे लुटले नऊ लाख

 

व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून नऊ लाख पाच हजार रुपये लुटल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. 


या घटनेनंतर व्यापा-याने पाेलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पाेलिसांना सांगितला

पाेलिसांनी दाेन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.


देवणी येथील बसस्थानकासमोरून गुरुवारी रात्री दुकान बंद करून घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख रक्कम नऊ लाख पाच हजार रुपये लुटण्या आले. ऐन बाजारात भरवस्तीत व्यापाऱ्यास लुटल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवणी येथील व्यापारी उमाकांत जगदीश जीवने हे नेहमीप्रमाणे आपले दुकान गुरूवारी रात्री सव्वानऊ वाजता बंद करून पैशाची बॅग घेऊन घराकडे जात होते. त्यांना बसस्थानकासमोरील घराच्या वाटेवर अडवून दोन अज्ञात व्यक्तींनी डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या जवळील नऊ लाख पाच हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला.


या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तिच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments