इस्लामपूर ; वाळवा तालुक्यातील अहिरवाडी येथील सुरज बाळासो सावंत (वय २५ ) या तरुणाचा डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करुन खून करण्यात आला.
हा प्रकार काल (गुरुवार) रात्री तुजारपूर गावच्या हद्दीत घडला.
सुरज हा गावातच दूध डेअरी चालवित होता. तो अविवाहीत असून, आई व तो दोघेच राहत होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.




0 Comments