सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील मुंढे येथे चिमुकल्या सख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
श्लोक अरविंद माळी (वय 3 वर्षे) व तनिष्क अरविंद माळी (वय 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
दरम्यान या दोघांच्या मृत्यूमुळे कराड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. धान्यात घालणाऱ्या औषधामुळे मृत्यू दोघांचा मृत्यू झाल्याने घरच्यांनी हंबरडा फोडला होता. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, धान्याची साठवणूक करण्यासाठी घरात पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्याने या उग्र वासामुळेच श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे चिमुकल्यांना नातेवाईकांनी कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच सोमवारी श्लोकचा मृत्यू झाला.
तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्का हिलाही उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिलाही नातेवाईकाने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचार सुरू असताना तिचाही मंगळवारी मृत्यू झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर त्यामध्ये आंतरगत अति रक्तस्त्रावामुळे व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तर तनिष्काचे मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेने मुंढेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास कराड पोलीस करत आहेत.




0 Comments