मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथील १९ जानेवारीपासून बेपत्ता झालेल्या कामू श्यामराव पाटील (वय ६५) यांचा मृतदेह गावाशेजारी मकेच्या फडात आढळून आला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१९ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ च्या दरम्यान निंबोणी गावातून चिटबायकडून ऊस गेलेली पावती घेऊन येतो म्हणून राहत्या घरातून कामू पाटील हे निघून गेल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने दिली.
तब्बल १८ दिवसांनंतर मृतदेहाच्या शरीराचा अवयव शेतातून बाहेर आल्याचे नागरिकांनी पाहिले. शेतात जाऊन पाहिले असता मृतदेहाचा वास येत होता.
कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची जागेवरच उत्तरीय तपासणी करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
नातेवाइकांकडून खुनाचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी नेमका हा मृत्यू कशाने झाला, याचा तपास सुरू केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी दिली.(स्रोत:सकाळ)
0 Comments