मंगळवेढा: व्हॉट्सअप ग्रुपचे नाव बदलले , एकास कुऱ्हाडीने मारहाण

 

मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथे व्हॉटसअप ग्रुपचे नाव बदलण्याच्या कारणावरुन संदिपान मोहन वाडदेकर (वय 34) या


तरुणाच्या डोक्यात कुर्‍हाड मारुन तसेच त्याच्या आई-वडिलांना दगडाने व काठीने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी


चंद्रकांत इंगोले, देवाप्पा इंगोले, नागन्नाथ इंगोले, ज्ञानेश्वर इंगोले, दादा इंगोले, समाधान इंगोले, अजित इंगोले आदी सातजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास यातील जखमी संदिपान वाडदेकर हे आपल्या घराजवळ असताना


कुलस्वामिनी शिवजन्मोत्सव तरुण मंडळ व्हॉटसअप ग्रुपचे नाव बदलण्याच्या कारणावरुन वरील आरोपींनी हातात कुर्‍हाड व काठी घेवून फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.

फिर्यादी व त्यांच्या कुटूंबास ठार मारण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments