हातभट्टी अड्ड्यावर छापा.....

 

लातूर : उदगीर तालुक्यातील काैळखेड येथे सुरू असलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती अड्ड्यावर पाेलिसांनी छापा मारला आहे.


यावेळी ५२ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अपर पाेलिस अधीक्षक डाम्. अजय देवरे, उपविभागीय पाेलिस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण ठाण्याचे पाेलिस निरीक्षक पवार यांनी ही कारवाई केली. त्यांना उदगीरलगत असलेल्या काैळखेड येथे चाेरट्या मार्गाने हातभट्टी दारू निर्मिती करून ती विक्री केली जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.


या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने छापा मारला. यावेळी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ८४० लिटर रसायन, हातभट्टी दारू असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल पाेलिसांनी नष्ट केला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात नितीन नामदेव चव्हाण (वय २९) आणि सुरज बाळू राठोड (वय २०, दाेघेही रा. कौळखेड) यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले, शिवप्रताप रंगवाळ, राम बनसोडे, गोविंद बरूरे, राहुल गायकवाड, सचिन नाडागुडे, स्वाती अतकरे यांच्या पथकाने केली आहे.


Post a Comment

0 Comments