९५ हजारांचा गुटखा जप्त.....

 

जालना: शहरातील दाणा बाजार परिसरात सोमवारी (दि. १३) रोजी रात्री उशिरा सदर बाजार पोलिसांनी कारवाई करत तब्बल ९५ हजारांचा गुटखा पकडला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी रात्री सदर बाजार पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना दाणा बाजार येथील चौंडीये ट्रेडर्स या दुकानामध्ये अवैधरित्या गुटखा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. 


या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून दुकानाची पाहणी केली असता प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री येथे आढळून आला. अतुल लक्ष्मीनारायण चौंडीये असे या दुकान मालकाचे नाव आहे. पोलिसांनी या दुकानातुन साठवलेला एकुण ९५ हजार ३८७ रुपये किमतीचा अशा प्रकारचा गुटखा व पान मसाला जप्त केला आहे.


दरम्यान, या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक उध्दव चव्हाण करीत आहेत.


Post a Comment

0 Comments