उभ्या महाराष्ट्राला याड लावणारी जोडी म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर
रिंकू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असून वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या फोटोशूटमधील काही निवडक फोटोही चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर आकाशने केलेल्या कमेंटमुळे नेटकऱ्यांच्या नजरा या जोडीकडे वळल्या आहेत.
रिंकून गुलाबी साडीमध्ये एक सुंदर फोटोशूट केलं असून त्यातील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
काय आहे आकाशची कमेंट?
रिंकूने शेअर केलेल्या फोटोवर आकाशने कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी असलेली स्माईली पोस्ट केली आहे. तर, रिंकूनेदेखील तशीच कमेंट करत आकाशला रिप्लाय दिला आहे. त्यामुळे अनेकांनी या जोडीला बेस्ट कपल, रिअल कपल, राजा-राणी असं म्हणत कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, आकाश सध्या त्याच्या आगामी घर बंदूक बिरयानी या चित्रपटात बिझी आहे. नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिरयानी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आकाशसोबत अभिनेता सयाजी शिंदेदेखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
0 Comments