रितू रवींद्र माळवी (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सासू कमला प्रभुलाल माळवी (वय 49) हिला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक समु चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सून घरात व्यवस्थित काम करत नाही, नातवाला व्यवस्थित सांभाळत नाही या कारणावरून सासू आणि सुनेत मागील काही दिवसांपासून वाद होते. याच कारणावरून सासू सुनेचा छळ करायची.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी आरोपी सासू घरातील फ्रिजचा दरवाजा उघडत होती. यावेळी तिचा पाय चुकून सुनेला लागला. या कारणावरून दोघींमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली.
तिचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत रितुच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
शवविच्छेदन अहवालात रितुच्या डोक्याला दुखापत तसेच तिला मारहाण झाल्याचे उघड झाले. सासू कमलाची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने सुनेला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची कबुली दिली.




0 Comments