सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या नवरा बायकोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एखाद्या व्यसनाची तल्लफ काय करायला लावू शकते ते या व्हिडिओतून दिसतंय.
गाडीवर जाताना पाठीमागे बसलेली बायको नवऱ्याला सिगारेट ओढण्यासाठी मदत करताना या व्हिडिओत दिसत आहे.
तर त्यांच्या पुढे त्यांचं लहान बाळही गाडीवर आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे याची अधिकृत माहिती समोर आली नसून पाठीमागे बसलेल्या महिलेने साडी घातल्याचं दिसत आहे.
तर तिच्या हातात सिगारेट असून ती मध्येमध्ये ती सिगारेट नवऱ्याच्या तोंडाला लावताना दिसत आहे. तर नवरा गाडी चालवता चालवता सिगारेटचे फुरके मारत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर पुढे लहान लेकरू असतानाही रस्त्यावरून जात असताना सदर व्यक्तीने सिगारेट ओढल्यामुळे काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.
0 Comments