मुंबई : राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने काल जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकंट ओढावले असल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन काढणीला आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आला असल्याचे दिसत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असताना एका शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अवकाळी पावसाने त्याचं उभं पीक आडवं झालं असून तो स्वतःला मारून घेताना दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने उभं पिक आडवे झाल्याचे पाहून स्वतःच्या तोंडात मारुन घेत आहे. एका शेतकऱ्याने सकाळी बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली असता शेतकऱ्याला अश्रु अनावर झाले.
एवढ्या मेहनतीने पिकवले पिक पाण्यात वाहून गेली हे पाहून तो पूर्ण हतबल झाल्याचे दिसून येत आहे. पिकांची अवस्था पाहून स्वत:लाच शेतकऱ्याने शिक्षा दिली. आपल्या हाताने तोंड झोडून काढत शेतकऱ्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दरम्यान, काही दिवसापूर्वी हवामानखात्याने राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.




0 Comments