दहावीच्या विद्यार्थ्याचा अजब प्रताप , चक्क नारळ फोडून केली पेपरला सुरुवात , व्हीडिओ प्रचंड व्हायरल

 

छत्रपती संभाजीनगर : माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण विभागामार्फत आजपासून दहावीच्‍या परीक्षेला  सुरवात झाली.


पेपराला जाण्यापुर्वी अनेक विद्यार्थी आई- वडील, देवाच्‍या पाया पडून आशिर्वाद घेत असतात. परंतु, औरंगाबादमध्ये  दहावीच्‍या काही विद्यार्थ्यांनी अजब प्रकार करत चक्‍क नारळ फोडून पेपराला सुरवात केली. याचा व्‍हीडीओ देखील प्रचंड व्‍हायरल झाला आहे


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. उच्‍च शिक्षणाची पहिली पायरी म्‍हणून दहावीच्‍या परीक्षेकडे पाहिले जाते. ही पायरी पार करण्यासाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत करत असतात.

 परंतु, परीक्षा जवळ आली की मनात धाकधूक असते. ही धाकधूक कमी व्‍हावी याकरीता अनेक विद्यार्थी हे मंदिरात जावू देवाचे दर्शन करतात. शिवाय, आई- वडीलांचे देखील आशिर्वाद घेतात. परंतु, छत्रपती संभाजीनगर परिसरात परीक्षा केंद्राच्‍या बाहेर काही विद्याथ्‍र्यांनी अजबच प्रकार केला आहे.


छत्रपती संभाजीनगरच्या लासुर स्टेशन येथील विद्यार्थ्यांचा हा प्रताप आहे. पेपर सुरू होण्याच्‍या काही वेळापुर्वीच या विद्याथ्‍र्यांनी हा प्रकार केला आहे. आपले नोटपॅड बाजूला ठेवून त्याच्या शेजारी एक दगड ठेवून नारळ फोडले. यावेळी बोल भवानी की जय चा जयघोष करून नारळ फोडत पेपराला सुरवात केली. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Post a Comment

0 Comments