सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणजे नाग साप. नागासोबत पंगा घेणे माणसांच्याही जीवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नागाने फणा काढला की भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
एक मुंगूस नागाच्या जवळ जाऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण मुंगूसाला पाहिल्यावर नागही पिसाळतो आणि त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. नाग आणि मुंगुसाचा रंगलेला हा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. नागाने फणा काढताच मुंगूस चार हात लांब झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नागाच्या दंशपासून वाचवण्यासाठी मुंगुस दोन पाऊल मागे टाकतो. पण पुन्हा तो नागावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. नागाने मुंगूसाला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंगूसाने नागाला घाबरुन पळ काढला. त्यानंतर नागही मुंगुसावर हल्ला करणे थांबवतो आणि त्याठिकाणाहून निघून जाण्याचा प्रयत्न करतो.




0 Comments