एखादी पार्टी किंवा लग्न डान्सशिवाय पूर्ण होत नाही. कार्यक्रमांमध्ये लोक मनसोक्त डान्स करतात. पण, कधी-कधी हा डान्स विचित्र पद्धतीने केला जातो. विशेषतः खेड्यातील लग्नांमध्ये केला जाणारा डान्स अतिशय विचित्र पद्धतीचा असतो.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्नात आलेले दोन तरुण अतिशय विचित्र असा कोंबडा डान्स करत आहेत. यावेळी दोघेही एकमेकांकडे पाहून चित्र-विचित्र हातवारेही करताना यात दिसत आहे. यावेळी ते कधी कोंबडा तर कधी मोरासारखे हातवारे करत आहेत. यावेळी एकजण जमिनीवर पालथा झोपूनही डान्स करतो. यावेळी तिथे उपस्थित लोकांनाही हसू आवरत नाही.
व्हिडिओ त्याच्या विचित्र डान्स स्टाइलमुळे चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. इंस्टाग्रामवर ही क्लिप काही वेळातच व्हायरल झाली. यावर सोशल मीडिया यूजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. कमेंटमध्ये अनेकांनी हसायचे इमोजीही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, फक्त हाच नाही, तर अशाप्रकारचे शेकडो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
0 Comments