मुंबई : लग्नाचा सीजन असला किंवा नसला तरी सोशल मीडियावर लग्नाच्या मंडपातील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात.
व्हिडीओत दिसत असलेले काका नेपाळी आहेत. त्यांनी त्या व्हिडीओमध्ये आपला पाय आपल्या खांद्यावर ठेवून डान्स केला आहे. हा डान्स करीत असताना त्या मंडपातील आणि आजूबाजूचे लोकांचं लक्ष त्यांनी त्यांच्याकडं वळवलं आहे.
त्या नेपाळी काकांचा डान्स सोशस मीडीयावर अनेकांना आवडला आहे. तो डान्स करताना काकांचा जोश पाहण्यासारखा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तिथं एक कार्यक्रम असल्याचं दिसतं आहे. सोशल मीडियावर हा डान्स पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट नेमकं काय सुरु आहे असं म्हटलं आहे.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ everythingaboutnepal या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांना आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 86 हजार लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट सुध्दा केल्या आहेत.
0 Comments