अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील धामोरी परिसरात काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंगाधर ठाकरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
त्याचबरोबर त्यांच्या हाताला 52 टाके पडले असल्याची माहिती समजली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धामोरी शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. वन विभागाने याची दखल घेऊन लवकरात लवकर परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेल बंद करावे अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केली आहे.
धामोरी परिसरात मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचं दर्शन अनेकांना झालं होतं. त्यानंतर अनेकांनी ही गोष्ट वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातली.
पण वनविभागाने शेतकरी आणि ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतात अनेक ठिकाणी अडचण असल्यामुळे बिबट्या परिसरात लपून राहत आहे. काल हल्ला झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. हल्ला इतका भयानक होता की, गंगाधर ठाकरे यांच्या हाताला जवळपास 52 टाके पडले.
सध्या त्या परिसरात वनविभागाचे अधिकारी येऊन गेले आहेत. त्याचबरोबर त्या परिसराची पाहणी करीत आहे. त्याचबरोबर बिबट्याला जेरबंद करण्याचं नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं आहे.
0 Comments