एका गाडीवर चार तरूण मुली बसून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये स्कूटीचा वेग वाढवून विना हेल्मेट या तरूणी सुसाट वेगाने जाताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका स्कूटीवर चार तरूणी बसल्या असून त्या मुंबईतील वाशी येथील पाम बीच रोडवरून जात असल्याचं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सुसाट वेगाने चाललेल्या चार तरूणींपैकी एकीच्याही डोक्यावर हेल्मेट नसून मागच्या मुलीने गाडीचा हँडल पकडल्याचं यामध्ये दिसत आहे.
तर गाडी चालवत असताना या तरूणींचे सेल्फी आणि फोटो काढणं सुरू असून या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. "मजा करणे ही एक वेगळी गोष्ट आहे, पण हा प्रकार गंभीर आहे, तरूण पिढीला अजून जागृतीची गरज आहे. या तरूणींच्या गाडीवर जास्तीत जास्त दंड लादला गेला पाहिजे." असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
सदर घटना २५ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर "हा तर पप्पांच्या पऱ्यांचा पराक्रम" अशा कमेंट काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
0 Comments