मुंबई - शहरातील वाकोला परिसरात रात्रीच्या सुमारास लक्झरी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला.
वाकोला परिसरातील मार्गावर बस आणि पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक बसली. त्यानंतर, बाजुलाच असलेल्या डिव्हायडरवर जाऊन टेम्पो आदळला होता.
या दुर्घटनेत टेम्पोचालकाला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीवरच मृत्यू झाला. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून रस्त्यावरील टम्पो क्रेनच्या सहाय्याने रात्री उशिरा हटविण्यात आला.
दरम्यान, घटनेनंतर लक्झरी बसचा चालक पळून गेला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.




0 Comments