इंदापूर: दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकराने मृत्यू......

 

इंदापूर : रंगपंचमी दिवशी रविवारी (दि.12) मैत्रिणींबरोबर रंग खेळून झाल्यावर गप्पा मारत बसल्यानंतर अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.


सरडेवाडी (ता. इंदापूर) गावात ही घटना घडली. सरडेवाडीचे माजी उपसरपंच सदस्य सतीश चित्राव यांनी याबाबत माहिती दिली. सृष्टी सुरेश एकाड (वय 16, रा. जाधववस्तीनजीक, सरडेवाडी) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.


रंगपंचमीनिमित्त मैत्रिणींबरोबर एकमेकींना रंग लावून तिने रंगपंचमीचा आनंदही घेतला. मात्र, याच वेळी अचानक तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. 


चुलते सचिन एकाड आणि मनोज चित्राव यांनी त्वरित तिला इंदापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सृष्टी ही इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती.


Post a Comment

0 Comments