पंढरपूर (प्रतिनिधी):- चंद्रभागेच्या पत्रामध्ये वाळू चोरी मुळे पडलेल्या खड्ड्यामध्ये कचर्याची होळी पेटवून महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रभागेतील वाळु रोरीचा निषेध करत, आज शिमग्या दिवशीच चंद्रभागेच्या वाळवंटात पेटवलेल्या होळीसमोर प्रशासनाविरुध्द बोंबाबोंब केली.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने चंद्रभागेच्या पात्रामध्ये कचर्याची होळी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने चंद्रभागेतील पडलेल्या वाळूच्या खड्ड्यामुळे येणार्या भाविकांना भरपूर त्रास होतो, अनेक भाविकांचा जीवही गेलेला आहे, आणि भविष्यामध्ये भाविकांचा जीव जाऊ नये यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलली पाहिजेत. या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने वाळूत पडलेल्या खड्ड्यामध्ये कचर्याची होळी करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आता तरी झोपलेल्या शासनाला जाग यावी वाळू चोरी चंद्रभागेतून कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी महर्षी वाल्मिकी संघाने हा उपक्रम हाती घेतला होता. शासनाला लवकरात लवकर जाग न आल्यास महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
यावेळी गणेश अंकुशराव, चंद्रकांत अभंगराव, गणेश तारापूरकर, महादेव कांबळे, सचिन नेहतराव, वैभव माने, चंद्रकांत माने, तुकाराम अंकुशराव, आप्पासाहेब करकमकर, बंडू नेहतराव, रोहन कांबळे, रोहन कांबळे, भैय्या माने व असंख्य भाविक व वासुदेव उपस्थित होते.




0 Comments