पंढरपूर रोटरी क्लब कडून टी. बी. रूग्णांना प्रौष्टिक आहार वाटप

पंढरपूर: प्रतिनिधी 

रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून गादेगाव (ता.पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र


व परिसरातील टी. बी. रुग्णांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला असल्याचे रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी माहिती दिली.


  गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात टी. बी.  रूग्णांना रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. यामध्ये गहू, तेल, शेंगदाणे, तुर दाळ, साबण आदी वस्तू भेट देण्यात आल्या.


   यादरम्यान गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. तांबोळी, रो. श्रीरंग बागल, रोटरी क्लब पंढरपूर चे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, सचिव सचिन भिंगे, रो. वर्षा विश्वंभर पाटील सह आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह व रोटरी क्लब ऑफ पंढरपूर चे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments