विमानतळावरून 1 कोटी 46 लाखांचे परदेशी चलन जप्त

 

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर कारवाई करून 1 कोटी 46 लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांना डीआरआयने अटक केली.


अमित कुमार, भीम सिंग, विक्रमजित अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.


मुंबईहून तीन जण दुबईला मोठय़ा प्रमाणात परदेशी चलन घेऊन जाणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीनंतर डीआरआयने आज सकाळी सापळा रचून अमितकुमार, भीम सिंग आणि विक्रमजितला ताब्यात घेतले.


 त्यांच्याकडील ट्रॉली बॅगची तपासणी केली. त्या बॅगेत डीआरआयला 1 कोटी 46 लाख 55 हजार रुपयांचे परदेशी चलन आढळून आले. चलनप्रकरणी डीआरआयने त्या तिघांची चौकशी केली. तस्करीच्या मोबदल्यात त्या तिघांना एका व्यक्तीने दहा हजार रुपये आणि दुबईची विमान प्रवासाची तिकिटे दिली होती.

 ते तिघे परदेशी चलन तस्करी करणाऱया टोळीचे असल्याचा डीआरआयला संशय आहे. त्यांना पैशांची बॅग देणाऱया व्यक्तीचा डीआरआय शोध घेत आहे. अटक केलेले ते तिघे हरयाणाचे रहिवासी आहेत.


Post a Comment

0 Comments