प्रियकराच्या मदतीनेच अडीच वर्षाच्या चिमुरडीचा खून

 

पुणे : पोटच्या लेकीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला खडकी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.


चार दिवसांपूर्वी पुण्यातील खडकी परिसरात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे शहरासह खडकी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. लक्ष्मी (32, रा. अकोला), संतोष देवमन जामनिक (वय 31 वर्ष रा. दापोडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. लक्ष्मी अकोला येथे पतीसोबत राहत असून तिचा पती व्यसनी असल्याने तिचे सदर गावातील मुलगा संतोष याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते.


संतोष हा कामानिमित्त पुणे येथे आल्याने लक्ष्मीने तिच्या माहेरील लोकांना नातेवाईकाकडे जाते सांगून घरातून गेली. आपल्या दोन मुली व एक मुलगा हा माहेरी ठेऊन सर्वात छोटी असलेली मुलगी सोबत घेऊन नातेवाईकाकडे न जाता आठ दिवसापूर्वी तिचा प्रियकर संतोषकडे पुण्यात आली होती. पुण्यात राहत असताना दोघांनी तिचा खून केला. नंतर मुलीचा मृतदेह खडकी येथील मोकळ्या मैदानात टाकून दिला.


याबाबत पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार देखील देण्यात आली नव्हती.

त्यामुळे खडकी पोलीस आणि गुन्हेशाखेच्या पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही धुंडाळले त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष त्यांना जाताना दिसले. महिलेच्या खांद्यावर मुलगी दिसत होती. याच सीसीटीव्हीचा धागा पकडत पोलीस दोन्ही आरोपींपर्यंत पोहचले. पोलीस आयुक्त रितेश देशमुख, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या पोलीस ठाण्याचे पथक आणि गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments