मंगळवेढा: घरासमोर फांदी टाकल्याच्या कारणावरुन एकास डोक्यात दगड घालून केले जखमी ; पती - पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

 

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे झाडाचे फांदे घरासमोर टाकल्याच्या कारणावरून रमेश लोखंडे यास शिवीगाळ व दमदाटी करून डोक्यात दगड मारून जखमी केल्याप्रकरणी


बाबासाहेब आबासाहेब धनवे व मंदाकिनी आबासाहेब धनवे या पती पत्नीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी रमेश गजानन लोखंडे दि.25 रोजी सकाळी 7.00 वा. घरी असताना आरोपीनी त्यांचे शेतातील बोराचे झाडाची फांदी तोडून फिर्यादीच्या घरासमोरील शेताच्या बांधावर आणून टाकले होते.

यावेळी फिर्यादी आरोपीना झाडाची फांदी आमच्या घरासमोर का टाकता असे विचारले असता आरोपीनी माझे शेतात टाकले आहे.


तुला काय त्रास? असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगड घेवून फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या व उजव्या बाजूस

मारून गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments