पिंपरी : जावयाकडून सासऱ्याला मारहाण करत कोयत्याने वार

 

पिंपरी : जावयाने सासर्‍यावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 15) रात्री एमआयडीसी भोसरी येथे घडली. सीताराम नागोराव पवार (40, रा. एमआयडीसी भोसरी) असे जखमी सासर्‍याचे नाव आहे.


याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल बाळू पवार (30, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भावाचे भांडण झाले होते. 


या भांडणाच्या रागातून फिर्यादी यांचा जावई राहुल याने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने पायावर मारून पाय फ-ॅक्चर केला. तसेच, कोयत्याने मोबाईल फोडून त्याचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments