साहेबराव कोकणे (अहमदनगर) : शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी आणि लूटमार करणाऱ्या आरोपींच्या टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
सुमारे 3 लाखांची चोरी केल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी गोळी घालून लुटमार करत हत्या केल्याचेही या गुन्हातून निष्पण्ण झाले आहे. गावठी कट्टे आणि पिस्तूलचा धाक दाखवत चोरी करणाऱ्याना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी आणि लूटमार करणाऱ्या आरोपींच्या टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. 23 फेब्रुवारी 2023 रोजी नगर शहरातील केडगाव बायपासजवळ असलेल्या हॉटेल K9 समोर शिवाजी होले यांची गोळी घालून हत्या करून 6000 रुपये चोरून नेल्याची घटना घडली होती.
घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी घारगांव शिवारात असलेल्या लक्ष्मी टायर पंक्चर दुकानात चाकुचा धाक दाखवुन दुकाना समोरील 34 हजार 500 रुपये किंमतीची मोटार सायकल, मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली.
इतकेच नाही तर संगमनेर येथील पंपावर चाकू व गावठी कट्टयाचा धाक दाखवून पंपावरील 2 लाख 50 हजार 747 रुपये रोख असा एकूण 2 लाख 85 हजार 247 रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.
दरम्यान हे तिनही गुन्हे अजय चव्हाण याने त्याचे साथीदारासह केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान तो मागच्या काही दिवसांपासून फरार होता. याबाबत पोलिसांना माहिती लागताच राहुरी तालुक्यातील वळणपिंप्री येथे घरी आला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अजय चव्हाण तसेच त्याचे साथीदार सागर जाधव आणि राजेंद्र शिंदे यांना जेरबंद केले आहे. दरम्यान अटक केलेल्या 3 आरोपींपैकी अजय चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून पुढील तपास आता पोलिस करत आहेत.
0 Comments