लोकं थबकले , ट्रॅफिक थांबलं , भर चौकात कपलचा रोमांस बघुन.....

 

तुम्ही हम दिल दे चुके सनम सिनेमा पाहिला असेलच ना? त्यात फॉरेनमध्ये तिकीटाचे पैसे नाहीत म्हणून अजय देवगण आणि ऐश्वर्या एकमेकांना हग करतात आणि कंडक्टर त्यांच्या नावाने ओरडून ओरडून शेवटी निघून जातो.


शिवाय भर रस्त्यात हिरो हिरोइन एकमेकांना गळाभेट घेऊन ट्रॅफीक जाम करतात असे अनेक प्रसंग आपण पाहिले असतील.


पण अशी घटना प्रत्यक्षात घडली. चक्क संस्कृतीचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात सुसंस्कृत पुणेकर या घटनेचे साक्षीदार झाले होते, अशी चर्चा सुरू आहे. याविषयीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

एका चौकात एक तरुण आणि तरुणी एकमेकाच्या गळ्यात गळे घालून उभे असातानाचा हा व्हिडीओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. साऱ्या जगाचा विसर पडून ते दोघे एकमेकात असे हरवले होते की, गाड्यांचे हॉर्न, माणसांचा गोंधळ किंवा अगदी ट्रॅफीक पोलीसाचा आरडाओरडा कशाचेही त्यांना भान नव्हते.


आजूबाजूचे लोक, ट्रॅफीक पोलीस त्यांना हटवण्यासाठी फार प्रयत्न करतात, त्यांना ओरडतात पण हे दोघे आपल्याच दुनियेत असल्याचं दिसतं. त्यामुळे संपूर्ण ट्रॅफीक तिथे खोळंबलं आणि जाम झालं. त्यामुळे तिथे अडकलेले लोक या सर्व प्रकाराने भडकले होते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर लोकांचे कमेंट्सही बरेच अतरंगी आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की हा व्हिडीओ जुना आहे. पण हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याविषयी बराच गोंधळ आहे.

Post a Comment

0 Comments