धक्कादायक: आधी डोकं दगडानं ठेचलं अन् नंतर 85 वर्षांच्या वृद्ध महिलेवर केला बलात्कार

 

आरोपीनं तिला लिफ्ट देऊ असं आश्वासन देऊन महिलेला दुचाकीवर बसवलं. त्यानंतर त्यानं तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.


कर्नाटक पोलिसांनी  हसन जिल्ह्यातील 85 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा छडा लावलाय.

पोलिसांनी दोषीला देखील अटक केलीये.

32 वर्षीय मिथुन कुमार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यातील यारेहल्ली गावात 2 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली. एका वृद्ध महिलेचा विवस्त्र मृतदेह शेतात सापडला, तिचं डोकं ठेचण्यात आलं होतं.

पोलिसांनी तपास केल्यानंतर, पाच वर्षांपूर्वी वृद्ध महिलेवर बलात्काराच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या आरोपींच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितलं की, पीडित वृद्ध महिला तिच्या शेतात जाऊ शकत नव्हती, त्यामुळं तिनं एका दुचाकीस्वाराकडं लिफ्ट मागित


आरोपीनं तिला लिफ्ट देऊ असं आश्वासन देऊन महिलेला दुचाकीवर बसवलं. त्यानंतर त्यानं तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. जेव्हा वृद्ध महिलेनं विरोध केला, तेव्हा आरोपीनं तिचं डोकं मोठ्या दगडानं ठेचलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. 

वृद्ध महिला घरी न परतल्यानं चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी तिचा शोध सुरू केला असता, तिचा मृतदेह शेतात सापडला आणि हा प्रकार उघडकीस आला.ली. 

Post a Comment

0 Comments