घर बांधण्याचे स्वप्न घेऊन निघाले अन् तितक्यात .... टेम्पोखाली आल्याने शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू

 

पुणे : पुण्याहून  आणलेलं घराचे बांधकाम साहित्य  घेऊन जाणारा पिकअप टेम्पो उलटल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे

वेल्हा तालुक्यातील शिरकोली गावाच्या हद्दीत हा टेम्पो उलटल्याने शेतकरी त्याखाली आला होता. यातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. कच्च्या दगडांच्या रस्त्यावरून पिकअप टेम्पो जात असतानाच तो उलटला आणि त्यातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला.


कोंडीबा आबाजी ढेबे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील शिरकोली गावाच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला आहे.


 कोंडीबा आबाजी ढेबे पुण्यावरुन घराचे बांधकाम साहित्य घेऊन पिकअप टेम्पोने घरी जात होते. मात्र कच्च्या रस्त्यावरच टेम्पो उलटल्याने कोंडीबा ढेबे त्याखाली आले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. ढेबे यांच्या अपघाताती निधनाने शिरकोली पानशेत परिसरावर शोककळा पसरलीय.


आपल्या नव्या घराचे स्वप्न उराशी बाळगून कोंडीबा उर्फ भाऊ आबाजी ढेबे पुण्यावरुन सामान घेऊन शिरकोली येथे निघाले होते. यावेळी कोंडीबा यांचा भाऊ तुकाराम ढेबेदेखील सोबत होते. कच्च्या दगडांच्या गोट्यांच्या रस्त्यावरून चढावरुन टेम्पो अचानक पलटी झाला. त्यावेळी टेम्पोमध्ये बसलेले ढेबे हे टेम्पोखाली आले. चाकाखाली आल्याने ढोबे यांचा जागीच मृत्यू झाला. मयत कोंडीबा ढेबे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments