पुणे: शेजाऱ्यांनी घेतला चारित्र्यावर संशय, महिलेची आत्महत्या दाम्पत्य अटकेत

 

पुणे : शेजारच्यांनी केलेल्या सततच्या बदनामीला कंटाळून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजारी राहत असलेल्या दांपत्याने चारित्र्याचा संशय घेतल्यामुळे विवाहित महिलेने विष प्राशन करून केली आत्महत्या केली.


शाहीन अत्तार (३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पुण्यातील लोणी कंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे कोलवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात शाहीनचे पती शौकत अत्तार यांनी फिर्याद दिली आहे. या संदर्भात शाहीन यांच्या शेजारी राहत असलेल्या ज्ञानेश्वर लटके आणि त्यांची पत्नी शितल लटके या दोघांना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन आणि तिचे पती शौकत गेल्या अनेक दिवसांपासून लोणी कंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे कोलवाडी या भागात राहायला होते. अनेक वर्षांपासून त्यांची त्यांच्या शेजारी राहत असलेल्या ज्ञानेश्वर लटके आणि शितल लटके यांच्याशी ओळख होती. लटके हा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत, तर शाहीन चे पती हे अंडे विक्रेते आहेत.


मात्र काही दिवसांपूर्वी शितल लटके आणि शाहीन मध्ये वाद होत होते. शितल यांनी शाहीन यांना आपल्या नवऱ्यापासून लांब राहण्यास देखील सांगितले होते. अनेक वेळा लटके दांपत्याने शाहीनच्या चारित्र्यावर संशय घेत "तू मोबाईल वर कुणाला बोलतेस हे तुझ्या नवऱ्याला सगळे सांगतो" अशी धमकी देखील दिली होती.

काही दिवसांपासून यांच्यामधील वाद आणि भांडणं वाढली होती आणि अखेर या दोघांनी केलेल्या बदनामीला कंटाळून शाहीनने विष प्रश्न करून आत्महत्या केली. या प्रकरणी लटके दाम्पत्याला अटक केली असून पुढील तपास लोणी कंद पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments