सातारा: शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याप्रकरणी सदर शेतकऱ्यावर कारवाई करत तब्बल 3 लाखांचा अफू जप्त करण्यात सातारा पोलिसाना यश आलं आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी थेट शेतात जाऊन धडक कारवाई करत सदर शेतकऱ्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा अधिक तापस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळिकवाडी ता. फलटण गावाच्या हद्दीत बाचकी नावाच्या शेतात सुरेश शिवराम पवार या शेतकऱ्याने त्याच्या मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यांनतर पोलिसांनी शेतात छापा मारला असता एकुण 2737 झाडांची लागवड करुन त्याची जोपासना करत असलयाचे पोलिसांना आढळून आले.
0 Comments