मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची , तलावात बुडून तलाठी नरेंद्र मुदगुलवारांचा मृत्यू

 

भोकर : तालुक्यातील नारवाट शिवारातील धानोरा तलावात पोहतांना तलाठी नरेंद्र वसंतराव मुदगुलवार यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज ( दि. १) सकाळी घडली आहे.


नरेंद्र वसंतराव मुदगुलवार (ह.मु.

नांदेड) हे मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा सज्जा येथे तलाठी पदावर कार्यरत आहेत. आज सकाळी भोकर ते नांदेड रस्त्यावरील नारवाट शिवारातील धानोरा तलावात मुदगुलवार मित्रांसोबत पोहण्यासाठी गेले होते. 


दरम्यान, तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मुदगुलवार यांचा मृत्यू झाला. 


तलाठी मुदगुलवार हे पूर्वी भोकर येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी भाऊ, मुलगी असा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments