पुणे : शहरातील मांगडेवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या डोक्यात कोयत्याने व दगडाने वार करण्यात आले आहेत. जुन्या वादातून हा खून झाला असण्याची शक्यता आहे.
तन्मय इंगळे (वय १७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय याच्या ओळखीतील ही मुले आहेत. सुपारी ते मांगडेवाडी परिसरात एका मोकळ्या जागेतील झाडा खाली बसले होते. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला.
वादानंतर चार मुलांनी त्याच्यावर दगड व कोयत्याने हल्ला केला. त्याच्या डोक्यात वार केले. त्याचा खून करून मुले पसार झाली. याची माहितीच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच, पसार झालेल्या चौघापैकी तिघांना ताब्यात घेतले. तीनही मुलं अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान त्याला जुन्या वादातून मारण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र या खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नसून, पोलीस त्याबाबत तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गुन्हे घडत आहेत. यामध्ये खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली.
0 Comments